Manoj Jarange : जरांगे पाटील जिंकले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडले उपोषण…
Manoj Jarange : मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. ख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आणि एकमेकांना पेठे भरुन आनंद साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आणि एकमेकांना पेठे भरुन आनंद साजरा केला. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची गळाभेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करीत मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. त्यानंतर “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आम्ही त्यांचे पत्र स्वीकारू. मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार आहे” असे जरांगे यांनी मध्यरात्रीच पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. Manoj Jarange
त्यानुसार, आज सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन सरकारचा अध्यादेश जरांगे पाटील यांच्या हाती दिला. मग, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन जरांगेंनी उपोषण सोडले. यावेळी क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहारही अर्पण करण्यात आला.