मंगलदास बांदल यांच्या टिकेने रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा ! पवार कुटूंबियांच्या टिकेची पातळी चर्चेत ..!!


 

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा  नारळ चढविताच दोन्ही पवार कुटुंबियांनी शेलक्या भाषेत केलेल्या टिकांमुळे कुटूंबियाकडूनच प्रचाराची पातळी खालवली आहे. एका बाजूने ‘मलिदा गॅंग’ असा उल्लेख झाला आहे. तर दुसरीकडे सहानुभूतीसाठी आश्रू बाहेर काढतील इथपर्यंत एकमेकांचा वैयक्तिक समाचार घेण्यात येत आहे.

 

अशातच काल महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीच्या कन्हेरी येथील मारुती मंदिरातून झालेल्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी मंगलदास बांदल यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या जोरदार टिकेने आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून एक पोस्टमुळे अजित पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

 

कन्हेरी मारुती मंदिरातून झालेल्या प्रचार शुभारंभात दोन्ही पवारांनी एकमेकांवर आरोपांचा भडीमार केला आहे . सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आलेल्या मंगलदास बांदल यांनी अजित पवार यांच्या प्रेमामुळे आपण सुनेत्रा वहिनी यांचा प्रचारात उतरल्याचा उल्लेख करीत सुनेत्रा पवार यांची सभा गाजवली आहे . आपल्या भाषणात त्यांनी थेट शरद पवार यांना जोरदार लक्ष केले आहे. पवार यांनी कोणावर
कसा डाव रचला , कोणाची कशी अवहेलना केली. यावर त्यांनी थेट हल्ला केल्याने मंगलदास बांदल यांचे भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.

 

मंगलदास बांदल म्हणाले , अजित पवार यांची भूमिका कशी योग्य असल्याचे सांगून शरद पवार यांनीच अजित पवार यांची वेळोवेळी बदणामीस कसे भाग पाडल्याचा थेट हात त्यांनी पवार कुटुंबियांत घातला आहे. यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊन आजपर्यंत राजकारण करीत आलेल्यांना कधीही यशवंतराव चव्हाणांची उंची गाठता येणार नसल्याचे बांदल यांनी सांगून त्यांना देवाने सदबुद्धी देवो, आणि सुप्रिया सुळेंचा अर्ज मागे घेवो, अशा शब्दांत बांदल यांनी पवारांचा समाचार घेतला.

 

शरद पवार सुसंस्कृत नेते म्हणवतात मग जनता दलाचे दादा जाधवराव यांना ते म्हतारा बैल म्हणतात. शिरूरचे सूर्यकांत पलांडेंच्या हातावर फोड असल्याने त्यांना कपड्याचा बाह्या काय सावरता असे म्हणून हिणवतात. तर जुन्नरचे दिलीप ढमढेरे आमदार होते. त्यांचा पाय तुटला होता, त्यांना म्हणाले पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायांनी द्या, दीड पायांनी देऊ नका. म्हणून पवार हिणवतात मग व्याधी तर सर्वांना आहेत. व्याधींवर बोलण्याचा कोणाला हक्क आहे का, असा थेट सवाल त्यांनी पवारांचे नाव घेऊन केला. शिरुर चे बाबुराव पाचर्णे यांना आमदारकीचा शब्द देण्याचा मी साक्षीदार आहे.आमदारकीची शब्द देऊन पक्ष प्रवेश देऊन रात्रीत कसा घात केला यावरही बांदलांनी शरद पवार यांचा समाचार घेतला.

 

 

या सर्व धारदार टिकेने रोहित पवारांनी थेट अजित पवारांना ट्विटद्वारे खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, अजितदादा तुम्हाला राजकारणात ज्यांनी सेट केले, सर्व काही दिले त्या पवार साहेबांवर टीका करण्यासाठी तुम्ही चिटर, खंडणीखोर, धमकी देणारा आणि जेलवारी करुन आलेल्या गुंड ‘अ’मंगलदास बांदल याची मदत घेता. तो टीका करताना स्वतः मान खाली घालून शांत बसता. हाच का तुमचा स्वाभिमान? साहेबांवर टीका करण्यासाठी भाडोत्री लोकांचा वापर करण्याचे तुमचे हे राजकारण कुणालाच पटणारे नाही. तुमच्यात झालेला हा बदल समजण्यापलीकडचा आहे, असेही रोहित पवार शेवटी म्हणाले. या सर्व टिकांमुळे पवार कुटूंबियांचा पुढील टिकांचा नवा अध्याय सुरू होणार असल्यांचे संकेत मिळू लागले आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!