Malegaon : माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ११ नवी गावे समाविष्ट करण्याचा ठराव नामंजूर..
Malegaon बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.३०) ॲड केशवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही विषयांवर किरकोळ गोंधळ झाला. Malegaon
यावेळी अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, सहकारमहर्षी चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष तसेच विद्यमान ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजनकुमार तावरे, विश्वास देवकाते, सर्व संचालक,सभासद, अधिकारी वर्ग उपस्थित होते. Malegaon
यावेळी चंद्रराव तावरे यांनी बोलताना अध्यक्षांनी प्रोसिडिंगमध्ये ११ गावे घेण्याचा ठराव मंजूर असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा खोटा ठराव प्रपंच अडचणीत आणणारा ठरू शकतो. त्यामुळे अध्यक्षांनी याच ठिकाणी ठराव रद्द केल्याचे लेखी पत्र आम्हाला द्यावे. त्याशिवाय सभा पुढे जाणार नाही असे सांगून त्यांनी विरोध केला.
त्यानंतर माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अँड.केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते आणि कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्या सहीने वार्षिक सभेतच सभासदांच्या मागणीनुसार सोमेश्वर कारखान्याच्या हदीतील ११ गावे न घेण्याचा लेखी ठराव दिला. त्यानंतर पुढील विषयाला सुरुवात झाली.
बाळासाहेब तावरे यांनी प्रास्ताविक करताना गतवर्षीच्या उसाला ३४११ राज्यात प्रथम क्रमांकाचा दर असल्याचे सांगितले. तर चंद्रराव तावरे यांनी ३१ कामगारांवरती केलेल्या फौजदारी गुन्हे दाखल असल्याचा मुद्दा आक्रमकपणे सभेत मांडला व आमच्याकडे निकाल आहे.
त्यास माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे असे सांगून असे असले तरी तुमच्याकडे काही निकाल असल्यास ते आम्हाला द्या निश्चितपणे यावर निकाल वाचून मार्ग काढला जाईल. असे सांगितले आहे.