विक्रमी दर देणारा माळेगावही यावर्षी २८०० च्या पहिल्या उचलीवरच थांबला, सभासदांमध्ये रंगली वेगळीच चर्चा…


बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याने पहिली उचल २८०० जाहीर केली आहे. गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माळेगाव साखर कारखान्याने मागच्या हंगामात ३६३६ रुपये राज्यात उच्चांकी दर दिला होता.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी माहिती दिली. एफआरपीच्या धोरणानुसार प्रतिटन २६२९.५० रुपये इतका ऊसदर बसत आहे. त्यामध्ये अधिकचे १७०.५० रुपयांची भर घालून एकूण २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल देणार आहेत. तसेच ३१ डिसेंबर पर्यंत गाळप झालेल्या उसाची रक्कम १३ जानेवारीपासून अदा केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, छत्रपती कारखान्याने पहिली उचल २८०० च जाहीर केली होती. यामुळे माळेगाव किती दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवारांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या या तिन्ही कारखान्यात एकच दर दिला असल्याने उसाची पळवापळवी होणार नाही, यासाठी असं केल्याचे सभासदांनी सांगितले.

दरम्यान, माळेगावच्या एफआरपीच्या नव्या सूत्रानुसार १०.२५ टक्के साखर उताऱ्यानुसार पहिला हप्ता दिला जातो. हंगाम संपल्यानंतर अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर एफआरपीची अंतिम रक्कम निश्चित होते. त्यामुळे हंगाम संपल्यावर उर्वरित फरक दिला जाणार आहे.

तसेच माळेगाव साखर कारखान्याची एफआरपी केंद्र शासनाच्या धोरणानुसार ३१२५ ते ३१७५ रुपये प्रतिटनच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, याबाबत केशव जगताप यांनी माहिती दिली आहे. आता जिल्ह्यातील इतर करखान्यांचे अंतिम दर किती असतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!