LPG गॅस सिलिंडरबाबत मोठी अपडेट! ‘या’ ग्राहकांची सब्सिडी होणार बंद; यादीत तुमचं नाव आहे का?

पुणे : एलपीजी गॅस कनेक्शनची e-KYC अद्याप पूर्ण केलेली नसेल, तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेणे महत्त्वाचे आहे. e-KYC प्रलंबित असलेल्या ग्राहकांना भविष्यात गॅस सिलेंडर बुकिंग, डिलिव्हरी किंवा इतर सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात.
गॅस ग्राहकांची ओळख आणि कनेक्शनची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी गॅस कंपन्यांकडून e-KYC करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC पूर्ण नसल्यास सबसिडीशी संबंधित व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

घरबसल्या कशी कराल e-KYC?


तुमच्याकडे इंडेन भारत गॅस किंवा HP Gas यापैकी कोणत्याही कंपनीचे कनेक्शन असल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत ॲपचा वापर करून e-KYC करता येते.
संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
गॅस कनेक्शनला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाने लॉगिन करा.
ॲपमध्ये e-KYC किंवा Aadhaar Verification हा पर्याय शोधा.
आवश्यक माहिती भरून आधार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा.
मोबाईल कॅमेऱ्याद्वारे मागितलेले Face Authentication पूर्ण करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर e-KYC स्टेटस तपासा.
e-KYC पूर्ण केल्यामुळे गॅस कनेक्शनशी संबंधित माहिती अद्ययावत राहण्यास मदत होते. त्यामुळे ग्राहकांनी आपली e-KYC स्थिती तपासून आवश्यक असल्यास प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल.