नसरापूर अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आरोपीची पोलीस कोठडी संपली, न्यायालयाचा मोठा निर्णय समोर…


पुणे : संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर प्रकरणातील मुख्य आरोपीबाबत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

यानंतर विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, प्रकरणाचा तपास अजून सुरू असून तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली जात आहे.

सरकारी पक्ष आणि विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्म यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयमाला पवार करत असून, आरोपीविरुद्ध पुरावे संकलनाचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

त्यानंतर योग्य वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. दरम्यान, नसरापूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!