मोठी बातमी! मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी..


मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे. मुंब्र्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले. प्रवाशांनी खच्चाखच भरलेल्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. धक्काबुक्की झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी दहा ते बारा प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे.

यापैकी पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी ७ वाजल्यापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी लोकलसाठी होत असते. शाळा महाविद्यालंय सुरू झाल्याने सकाळच्या वेळात ही गर्दी जास्त असते. लटकून प्रवास करत असल्याने हे प्रवासी खाली कोसळल्याची माहिती मिळाली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत.

अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!