उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना; हिमकडा तुटल्याने ४३ मजूर बर्फाखाली अडकले, बचावकार्य सुरू…

चमोली : उत्तराखंडमधील चमोलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील माणा गावात हिमकडा कोसळल्याने ४३ मजूर अडकले आहेत. १० जणांची सुटका करण्यात आली असून अजून ४३ जणांचा शोध घेतला जात आहे. त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत माहिती दिली. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथमधील माना गावातील सीमावर्ती भागात सीमा रस्ते संघटनेच्या छावणीचे बांधकाम मजूर काम करत होते. यावेळी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन कॅम्पजवळ एक मोठा हिमकडा कोसळला.
यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावेळी 57 कामगार बर्फाखाली दबले गेले. 57 कामगारांपैकी 10 कामगारांना वाचवण्यात यश आले असल्याचे पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले. दुर्घटनेवेळी एका खासगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत होते.
हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. हिमस्खलन झाले त्यावेळी सर्व कामगारांची पळापळ सुरू झाली आणि यात ५७ कामगार बर्फाखाली दबले आहेत. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र वेग जास्त असल्याने अनेकांना पळून जाता आले नाही. सध्या आयटीबीपी आणि लष्कराचे जवान येथे युद्ध पातळीवर मदतकार्य करत आहेत.
दरम्यान, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करासोबतच आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.