मोठी बातमी! भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात, ३५ प्रवाशांना घेऊन बस पुलावरून खाली कोसळली…


पुणे : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एसटी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने ही एसटी बस जात होती. एसटी बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. घटनास्थळी स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली. गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस २० फूट खोल ओढ्यात कोसळली.

या एसटी बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. यामधील दोन जण जखमी झाले आहेत तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. इतर सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!