मुंबईत मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीला शॉक, 1 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर…


मुंबई : राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना मुंबईच्या साकीनाका आणि विरारमध्ये दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी गणेश उत्सवाला गालबोट लागल आहे. साकीनाका परिसरातील एका विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीला शॉक लागल्याने एकाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर श्री गजानन मित्र मंडळाची मिरवणूक सुरू असताना त्यांच्या ट्रॉलीला लटकलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये टाटा पॉवर कमिशन 11000 ची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने उत्सवाला गालबोट लागला आहे.

दरम्यान या विसर्जन मिरवणुकीत ही वायर थेट गणपतीच्या ट्रॉलीला स्पर्श झाली. यानंतर अवघ्या काही सेकंदात या ट्रॉलीवर असलेल्या पाच जणांना शॉक बसला. त्यात हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी बिनू शिवकुमार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता, धर्मराज गुप्ता, आरुष गुप्ता, शंभू कामे आणि करण कान्होजीया यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सगळीकडे उत्साह शिगेला पोहोचला असताना घडलेल्या या घटनेमुळे मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!