Maharashtra Politics : शाहू महाराजांना बाजूला करणे खपवून घेणार नाही, शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजीराजे यांचा भाजपला इशारा..


Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जाहिरात भाजपने आज जवळपास सर्वच वर्तमानपत्रात दिली आहे. शपथविधी सोहळा महायुतीचा की भाजपचा असा सवाल जाहिरात पाहिल्यानंतर उपस्थित होतो.

या जाहिरातीवरुन चर्चा सुरू असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील टीका केली आहे. जाहिरातींमध्ये वरील बाजूला महापुरुषांचे फोटो छापले आहे. यामध्ये शाहू महाराजांचा फोटो न झापल्याने संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी जाहिरातीमध्ये महापुरुषांचे फोटो छापले. मात्र, शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. Maharashtra Politics

शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

निवडणुकीमध्ये हार जीत होत असते देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही तितका इतिहास महाराष्ट्राला आहे. त्यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे, असे देखील संभाजीराजे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!