Maharashtra Politics : पुणे जिल्हा (दक्षिण) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब महाडीक; हवेली तालुक्याला युवक अध्यक्षपदाची प्रथमच संधी…

Maharashtra Politics उरुळीकांचन : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पुणे जिल्हा (दक्षिण) युवक अध्यक्षपदी आनंद उर्फ अण्णा भाऊसाहेब महाडीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
शिंदवणे ( ता.हवेली ) येथील माजी सरपंच असलेल्या आण्णा महाडीक यांची जिल्ह्यात मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यांच्या निवडीचे पत्र रविवार (दि.२०) रोजी अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे उपस्थित होते. Maharashtra Politics
निवडीनंतर आण्णा महाडीक म्हणाले, की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी व युवकांच्या करीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष भर देणार आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांचा विश्वास सार्थ ठरविणार आहे.