Maharashtra Politics : पुण्यात आज काय घडणार? पुण्यात आज शरद पवार-अजितदादा आमनेसामने, राजकीय घडामोडींना वेग…


Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज दुपारी दोन वाजता पार पडणार आहे.

या डीपीडीसीच्या बैठकीचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहे. त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली तर शरद पवार आणि अजित पवार आज आमनेसामने येतील.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला शरद पवार हजेरी लावणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!