Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य २२ उमेदवारांची नावं समोर, आदित्य ठाकरे कुठून लढणार? महत्वाची माहिती आली पुढे…

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत सुरुवातीला मुंबईतील जागांबाबत निर्णय घेतला जात होता. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळा दावा केला जात होता. Maharashtra Politics
मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट २० ते २२ जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची मुंबईत २२ नावांवर प्राथमिक चर्चा सुरु आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
संभाव्य उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे…
वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी