Maharashtra Politics : मोठी बातमी! अजून एका माजी मंत्र्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, शिंदे गटात करणार प्रवेश…

Maharashtra Politics : राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेले नाही. याबाबत बोलताना घोलप यांनी सांगितले की, मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमाने ईतबारे काम केले आहे. Maharashtra Politics


मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले आले. मी ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी म्हणून काढुन टाकले होते व नविन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधीकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे.नेमक माझं काय चुकल ते समजल नाही.
मी याबाबत दादही मागीतली पण काहीच ऊत्तर मिळाल नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनीक पदाचा राजीनामा देत आहे असे घोलप यांनी स्पष्ट केले आहे.