Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर रात्री मध्यरात्री राजकीय घडामोडींना उत!! एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक…

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात मध्यरात्री उशीरा वर्षा बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
या बैठकीला विशेष महत्त्व आहे कारण राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आमने-सामने येणाऱ्या जागांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लाडकी बहिण योजना कशा प्रकारे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता येईल यावरही सविस्तर चर्चा झाली आहे. उदय सामंत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना योजनेचा प्रचार आणि प्रसार कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले. Maharashtra Politics
दरम्यान, काही न्यायालयीन अडचणी आणि योजनेच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेल्या अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली आहे. महायुतीत विविध मतदारसंघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, असे समजते.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वादग्रस्त मतदारसंघांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पुढील काही दिवसांत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल आणि वादग्रस्त मतदारसंघांवर अंतिम निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांच्या महायुतीत सामील होण्याच्या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर अनेक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करत आहेत.