Maharashtra Politics : मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा जाणार लांबणीवर?, गृह नव्हे आता ‘या’ खात्यावरून कोंडी, नेमकं घडतंय काय?


Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र होते. या दरम्यानच्या काळात महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यासोबत सुरू असलेल्या बैठकांचे सत्र पूर्ण झाले आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी होणार आहे. येत्या १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरुन महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोललं जात होतं. तर काही नेत्यांनी १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले होते. Maharashtra Politics

मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या या सर्व तारखा चुकीच्या ठरल्या आहेत. अखेर उद्या म्हणजे रविवारी १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या महायुतीतील तिढा कायम आहे. खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जातं आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रविवारी दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात शपथविधी होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!