Maharashtra Politics : ‘माऊलीं’च्या प्रचारात ७० वर्षीय ‘माऊली’ माघतेय आर्शिवाद! माऊलीची काटक पाऊले मतदारांना ठरवतोय कुतूहलाचा विषय…

Maharashtra Politics उरुळीकांचन : शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात भाविकांना तिर्थक्षेत्र दर्शन घडवून देऊन भाविकांचा ‘श्रवणबाळ’ ठरणाऱ्या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ त्यांच्या मातोश्री शालन पंढरीनाथ कटके याघरोघरी नागरीकांच्या भेटीगाठी घेत प्रचार करीत आहेत.
७० व्या वर्षी तरुणांना लाजवतील अशा पध्दतीने प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीसाठी घेऊन त्या ‘माऊली’ला मत द्या म्हणून आर्शिवाद माघत आहे. त्यांच्या या उतारवयात लेकाच्या विजयासाठी काटक पाऊले मतदारांच्या दारी पडत असल्याने त्यांच्या या कृतीने मतदारांचे मन भारावून जात असून’माऊली’ची माऊली म्हणून त्यांच्या या प्रचार कार्याचे जनतेत मोठे कुतूहल व्यक्त होत आहे.
लेकाला घडविण्यात ‘माय’ माऊली हात असतो ही म्हण अतिशय प्रचलित आहे. तीच म्हणं माऊली कटकेंच्या रुपाने या प्रचारात उतरलेल्या त्यांच्या माऊली ने अधोरेखित केली आहे. माऊली कटकेंच्या प्रचारात ७० व्या वर्षीचा उतारपण्याचा सिमा ओलांडून ही माऊली घरोघरी दारोदारी माझ्या माऊली मत द्या म्हणून रणरण फिरत आहे.
त्यांचा हा प्रचारातील सलग सहभाग हा तरुणांना लाजविणारा ठरवित आहे. शुक्रवार (दि.१५) रोजी ७० वर्षीय मालन कटके या उरुळीकांचन शहरात प्रचार करीत असताना त्यांनी एक सलग मतदारांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांनी ‘माऊली’ना विजयाची साद घातली. त्यांच्या अशा पद्धतीने प्रचाराची पाऊले घरोघरी फिरत असताना मतदारांनी ही त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा केली. त्यांच्या प्रचाराचे परिसरात मोठे कुतूहल नागरिक व्यक्त करीत आहेत.
माऊली कटके यांनी यापूर्वीच साधेपणाने लोकांची मने जिंकली आहे.त्यांच्यात प्रामाणिकपणा व दानशूरपणा आई म्हणून कौतुकाचे वाटते. अतिशय सामान्य शेतकरी कुटूंबातून राजकीय आलेख गाठत असल्याचा अभिमान त्यांना वाटत आहे. लेकाला आर्शिवाद राहू द्या म्हणून प्रचारात त्यांचे शब्द उच्चारत आहे. या शब्दांत त्यांची माऊलीची बद्दल माया व सांप्रदायिक क्षेत्रातील सद्भाव व विचारांची शुध्दता ही जाणवत होती.