Maharashtra Election Update : बारामती, चंद्रपूर, नाशिकमध्ये जोरदार सट्टा, लोकसभेला कोण जिंकणार? चर्चांना उधाण….

Maharashtra Election Update : सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर आला आहे. नेमकं कोण जिंकणार लवकरच समजणार आहे. असे असताना सट्टा बाजारात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जोरदार बेटिंग सुरू आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 8 ते 9 लाख कोटी रुपयांपर्यंत बेटिंग पोहचले आहे.
सध्या देशात एनडीएची सत्ता पुन्हा एकदा येणार असल्याचा कल सट्टा बाजारात असला तरी महाराष्ट्रात मात्र एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही बाजारातून केला जात आहे. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. २०१९ मध्ये एनडीएला 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. Maharashtra Election Update
सध्या मात्र निवडणुकीआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. हे पक्ष भाजपसोबत गेले, मात्र तरी देखील याचा फायदा होताना दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेले. एनडीएला 30 चा आकडाही ओलांडता येणार नाही असे दिसते.
सट्टा बाजारातून तसे संकेत मिळत आहेत. राज्यात एनडीएला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा कल आहे. बारामतीसह महाराष्ट्रातील इतर काही मतदारसंघातील निकालावरही सट्टा बाजारात जोरदार बेटिंग सुरू आहे.
दरम्यान, सट्टा बाजाराने सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कल दिला आहे. तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असे भाकित सट्टा बाजारात वर्तवले जात आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव होऊ शकते. या मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी होतील, असे सांगितले जात आहे.