Maharashtra Election 2024 : सी वोटर सर्व्हेने महायुतीचे टेन्शन वाढलं, जाणून घ्या संपूर्ण सर्व्हे…


Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील एक सर्व्हे समोर आला आहे.

‘सी वोटर’नं तो सर्व्हे केला आहे. सी वोटरच्या आकडेवारीनुसार ५१ टक्के लोकांचा कल असा होता की, ज्यामुळं विद्यमान महायुती सरकारमधील राजकीय पक्षांची चिंता वाढू शकते.

तसेच सी वोटरच्या सर्व्हेमध्ये जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भाजप शिंदे सरकारच्या कामगिरीवर नाराज आहात का? आणि सरकार बदलण्याची इच्छा आहे का? तेव्हा ५१.३ टक्के लोकांनी याचे हो असे उत्तर दिले. त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत राग असून सरकार बदलण्याची इच्छा असल्याचं म्हटलं. ३.७ टक्के लोकांनी राग आहे पण सरकार बदलण्याची इच्छा नसल्याचे म्हंटले आहे.

तर, ४१ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराज नसल्याचे म्हंटले. त्यांनी पुन्हा महायुती सरकार यावं, अशी त्यांना अपेक्षा आहे. ४ टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीच बोलायचं नाही,असे म्हंटले. यातून असं दिसून येतं की सरकार बदललं जावं असं वाटणाऱ्यांची संख्या जवळपास ५१ टक्के आहे. Maharashtra Election 2024

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांना जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती विचारण्यात आली तेव्हा २७.६ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं असं वाटणा-यांची लोकांची टक्केवारी २२.९ टक्के आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला १०.८ टक्के लोकांनी पसंती दिली. शरद पवार यांच्या नावाला ५.९ टक्के तर अजित पवार यांच्या नावाला ३.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.

सी वोटरच्या सर्व्हे नुसार ५२.५ टक्के लोकांनी कामगिरी चांगली राहिल्याचेम्हंटले. २१.५ टक्के लोकांनी कामगिरी सरासरी होती, असं म्हटलं. तर, २३.२ टक्के लोकांनी कामगिरी खराब असल्याचं म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!