Maharashtra : बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात, विद्यार्थ्यांनो जाणून घ्या…

Maharashtra : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असते. चालू शैक्षणिक वर्षात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये ही परीक्षा होणार आहे. Maharashtra
त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १ ऑक्टोबरपासून ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ३० ऑक्टोबर ही शेवटची मुदत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सरल प्रणालीबाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत अर्ज करावा लागेल.