गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…


लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले असून तर एकजण पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

ही कारवाई मंगळवारी (ता.०९) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंद्रे वस्ती, सार्वजनीक रोडच्या कडेला, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), परिसरात करण्यात आली आहे.

गणेश रावसाहेब गोडसे, (वय.२५ रा. आंद्रे वस्ती, लोणी काळभोर पुणे, मुळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तर अक्षय रवि पवार (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे फरार आरोपीचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

आरोपी गणेश गोडसे याच्या ताब्यातुन पोलिसांनी २२ हजार रुपये किमतीचा 1104 ग्राम गांजा व गुन्ह्यात वापरलेली २ लाखांची चारचाकी गाडी असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे पथक मंगळवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना गणेश गोडसे हा त्याचे साथीदार अक्षय रवि पवार, रा. लोणी काळभोर पुणे याच्यासह गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता दोन इसमांपैकी गणेश गोडसे याला त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.

दरम्यान, यावेळी त्याचा साथीदार अक्षय पवार याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो तेथुन पळुन गेला. पोलीसांनी गणेश गोडसे याच्या ताब्यातून 22 हजार रुपये किमतीचा 1104 ग्रम गांजा व गुन्ह्यात वापरलेली 2 लाखांची चारचाकी गाडी असा एकूण 2 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४०४/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii), भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीसांनी गणेश गोडसे याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गांजा हा त्याचा साथीदार मॅडी (रा. ससाणे नगर, पुणे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याचेकडुन खरेदी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यास देखील सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!