Loksabha Election : निवडणूकीतून माघार का घेतली? अखेर विजय शिवतारे यांनी अजित पवारांसमोरच सांगितले खरं कारण…
Loksabha Election : काहीच दिवसांपूर्वी विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण त्यानंतर शिवतारेंनी माघार घेतली.
अशातच आता नुकतीच बारामतीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे एकाच व्यासपीठावर होते.
काहीच दिवसांपूर्वी विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण त्यानंतर शिवतारेंनी माघार घेतली. या सभेदरम्यान, विजय शिवतारेंनी आपण निवडणुकीतून माघार का घेतली? याच कारण सांगितलं आहे.
शिवतारे म्हणाले की, मला बोललं जात होतं की आपण काहीतरी केले पाहिजे. माध्यमे मी जिथे असेल तिथे होता. माझं लॉजिक ठीक होतं. पण आता जाऊ द्या. लोकांना प्रचंड उत्साह होता. अनेक जण माझ्यापाठीशी उभे राहिले. दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, पण माझे मन तयार नव्हते, असे विजय शिवतारेंनी स्पष्ट केले. Loksabha Election
ते पुढे म्हणाले, दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. कोणत्याही प्रकारे लढायचं. गोष्टी घडत असतात, त्या विसरून जायच्या असतात. मतभेद असतात पण मनभेद नको. आगामी निवडणुकीत घड्याळाला मतदान झालं पाहिजे, सुनेत्रा पवार यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान. बारामतीच्या विजयाच्या वाट्यामध्ये पुरंदर असेल, असा विश्वास विजय शिवतारेंनी व्यक्त केला.