Lok Sabha Elections : शिरूरच ठरलं! अजितदादांचा हा शिलेदार उतरणार लोकसभेच्या मैदानात? अचानक नाव आलं समोर…


Lok Sabha Elections : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीला अद्यापही उमेदवार मिळालेला नाहीये, मात्र अनेकांची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी एक मोठे विधान केले आहे.

पक्षाने आदेश दिला तर प्रत्येक कार्यकर्त्याला तो आदेश स्विकारावा लागतो, हे जरी खरे असले तरी तशी परिस्थिती येईल असं वाटत नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हंटले आहे. ते भीमाशंकर येते पत्रकारांशी बोलत होते. दिलीप वळसे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचवल्या असून, दिलीप वळसे पाटील हे शिरूरमधून लोकसभा लढवणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

तसेच जर अजित पवार यांनी दिलीप वळशे पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून युतीचा उमेदवार म्हणून लढण्याचे आदेश दिले तर वळसे पाटील हे स्वत: निवडणूक लढवणार की त्यांच्या कन्या पूर्वा वळसे या निवडणूक लढवणार याबाबत आता राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू आहे. Lok Sabha Elections

यावर देखील वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपली कन्या पूर्वा सध्या तरी निवडणूक लढवणार नाही. मात्र पुढे पाहू, एखाद्या नवख्या उमेदवाराला जर लोकसभा लढवायची असेल तर त्याची पूर्वतयारी लागते. मात्र पूर्वाची तयारी नाहीये, असं स्पष्टीकरण त्यांनी यावर दिले आहे.

दरम्यान वळसे पाटील यांच्या या विधानानंतर आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात आढळराव पाटील निवडणूक लढवणार की, वळसे पाटील हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!