Lok Sabha Elections : मोठी बातमी! अमित शहांकडे अजित पवार यांनी लोकसभेसाठी ‘इतक्या’ जागांची केली मागणी…

Lok Sabha Elections : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटला नाही. घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळतील अशी चर्चा सुरु आहे. लोकसभेसाठी अजित पवार गट सात ते आठ जागांसाठी आग्रही असून त्यापैकी कमीत कमी सहा जागा आपल्याला मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. Lok Sabha Elections

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी शिरूर, सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली आणि बुलढाणा या जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, साताऱ्याची जागा भाजपाला पाहिजे आहे तर गडचिरोली येथे भाजपा चिन्हावर राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री बाबाराम आत्राम यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका घेतली जात आहे. पण राष्ट्रवादीचे नेते त्यास अनुकूल नाहीत.
परभणी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे आता या जागांचा तिढा कसा सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.