Lok Sabha Election : राज्यात बिघाडी पण बारामतीत एकोपा! वंचितचा सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा जाहीर…

Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता राज्यात जागावाटपाची बोलणी सातत्याने फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने वेगळी चूल मांडली आहे.
आता वंचितने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बारामतीत पाठिंबा दिला असून सुप्रिया सुळेंना वंचितने पाठिंबा दर्शवल्याने पक्षाला सुखद धक्का बसला आहे. बारामतीत आम्ही उमेदवार देणार नसून बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
वंचित आघाडीने आज पुण्यातून वंसत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी बारामतीत सुळेंना पाठिंबा जाहीर केला. अगोदरच वंचितने कोल्हापूरचे कॉग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना व नागपूरात गडकरींच्या विरोधात कॉंग्रेसचे विकास ठाकरेंना पाठिंबा दिला होता. आता बारामतीतही महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. Lok Sabha Election
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी आठ जागा जाहीर केल्या, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही काही जागा जाहीर केल्या आणि आता तिसरी यादी जाहीर करीत नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरूरचे उमेदवार निश्चित केले. शिरूरमधून मंगलदास बांदल यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे.