Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका, कोणत्या तारखेला कुठे मतदान? जाणून घ्या पूर्ण माहिती…
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच ४ जूनला सर्व देशात मतमोजणी होईल. vLok Sabha Election 2024
महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )