Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निकालावर अजित पवार यांचे थेट भाष्य! दादांनी स्पष्ट सांगून टाकले…


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदार संघात नुकतेच मतदान पार पडले. या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झालं. यामुळे कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये खडकवासल्यात ५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटली. यामुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे. यामुळे निकाल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक मतदारसंख्या खडकवासल्यात आहे.

यावर अजित पवार म्हणाले, आम्ही आमचे काम केले आहे. मी बारामतीच्या जनतेला सांगत होतो की, विरोधकांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका, त्यांच्यासाठी कोण काम करणार, कोणासाठी केंद्राकडून पैसे आणणार याचा त्यांनी विचार करावा. Lok Sabha Election 2024

तसेच विकास या भागातील जलसंकटाची समस्या कोण सोडवू शकेल, मतदारांनी आमचे म्हणणे ऐकले आहे आणि आमचा उमेदवार बारामतीतून विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार कुटुंबातील मुलगी आणि सून येथून निवडणूक लढवत आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!