जनाई शिरसाई योजनेसाठी मोठ्या प्रमाणवर निधी उपलब्ध, बंदिस्त पाझरचर योजनेला देखील लवकरच मान्यता, आमदार राहुल कुल यांची माहिती…


उरुळीकांचन : मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतर स्वयंचलित बॅरेजेसमध्ये करण्यासाठी व फुगवटा क्षेत्रात बॅरेजेस बांधण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

पुणे व परिसरातील शेतीच्या पाण्याच्या संदर्भातील आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभा सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात जमिनी पाझरपड झालेल्या आहेत, जमिनी विकसित करत असतना ओढे नाले सपाटीकरण करण्यात आले आहे. पुढील काळात या जमिनी कसणे देखील अवघड होईल, त्यामुळे ओपन पाझरचर करण्यासाठी मापदंड निश्चित करून, प्रस्तावास मान्यता द्यावी, अनेक शेतकरी बंदिस्त पाझरचर करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी धोरण नसल्याने अडचणी येत असल्याने त्यासाठी देखील मापदंड निश्चित करणे आवश्यक आहे.

तसेच कॅनॉल व नदीक्षेत्र यासाठी वेगवेगळी धोरणे असून नदीक्षेत्रात क्षारपड जमिन सुधारणेकरीता २० टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा रद्द करून १०० टक्के अनुदान शेतकऱ्यांना देणेबाबतची मागणी केली. मुळा मुठा व भीमा नदीवर अनेक कोल्हापुर पद्धतीचे बंधारे असून ते जीर्ण झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्यास अडचणी येत असल्याने उक्त बंधाऱ्यांचे स्वयंचलित बॅरेजेसमध्ये रुपांतर करणे आवश्यक असून, तालुक्याच्या अनेक गावांतील शेती उजनीच्या बॅकवॉटरवर अवलंबून आहे.

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळास सामोरे जावे लागते, त्यामुळे या भागात बॅरेजेस किंवा बुडीत बंधाऱ्यांची साखळी बांधण्याची आवश्यकता आहे. यासाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार करून त्यांना मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बाबत कुल म्हणाले, जनाई शिरसाई योजनेच्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणवर निधी उपलब्ध करून दिला असून, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील खुपटेवाडी फाट्याचे सर्वेक्षण पूर्ण करून, अंदाजपत्रके तयार करावीत व त्याचे काम देखील गतीने पूर्ण करावे अशी मागणी केली.

पुणे शहराच्या जादाच्या पाणी वापरामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणवर पाणी टंचाई जाणवत आहे. मुळशी धरणाचे पाणी पूर्वमुखी वळवून ते पुण्याला पिण्यासाठी दिल्यास तो निर्णय लवादाच्या नियम अटीमध्ये अडकणार नाही, त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी देखील मागणी आमदार राहुल कुल यांनी यावेळी केली. यावेळी आमदार कुल यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब म्हणाले, ज्या भागातील सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण झाले त्या भागातील जमिनी चिबड, पाणथळ व क्षारयुक्त झालेल्या आहेत, त्यामुळे ओपन पाझरचर बरोबरच, बंदिस्त पाझरचर योजना राबिण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जाईल.

लाभक्षेत्र व लाभक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी यांच्यासाठी असलेल्या १० टक्के व २० टक्के खर्चाची अट रद्द करण्यात येईल, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जीर्ण झाले असल्याने त्यांची दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी स्वयंचलित बॅरेजेस बांधण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे पाणी साठ वाढेल गळती थांबल्यामुळे पाण्याची बचत होईल. उजनी धरणाची फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधकाम करण्याची योजना ही कालबाह्य झाली त्याची उपयुक्ता देखील राहिलेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी देखील बॅरेजेस बांधल्यास त्याची उपयुक्तता देखील जास्त होईल.

पुणे महानगरपालिका पाणी वापरच्या बाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जास्तीचे वापरलेले पाणी प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळवून देण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याचा निर्णय देखील लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!