Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लावला चुना, योजनेत धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच नांदेडमध्ये लाडक्या बहीण योजनेतील मोठा घोटाळा उघड झालाय.

बनावट कागदपत्रांनी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांच्या नावाने काढले गेले आणि हा सगळा प्रकार करणारा डिजीटल केंद्र चालकच जवळपास साडे तीन लाख रूपये हडपून पसार झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील मनाठा येथे हा प्रकार घडला.
अनेक गावात सरकारच्या योजना मिळाव्या म्हणून डिजीटल केंद्र आहेत. मनाठा या गावात ज्यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यानेच अपहार करून पोबारा केला. Ladki Bahin Yojana

गावातील अनेक महिलांसह आजूबाजूच्या गावातील काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत. या सर्व महिलांची कागदपत्र डिजीटल केंद्र चालक यांच्याकडे जमा होती. यानंतर केंद्र चालकाने गावातील महिलांचे पैसे येणार आहे, असे सांगून गावातील काही पुरूषांचे आधारकार्ड आणि पासबुक मागितली.

प्रत्यक्षात महिलांचे अर्ज भरताना या केंद्र चालकाने महिलांच्या अर्जासोबत पुरूषांचे अधारकार्ड जोडले. याद्वारे त्याने ३ लाख १९ हजार लाडक्या बहिणीचे पैसे जमा करून ते काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.