Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! चौथा आणि पाचवा हप्ता एकदम होणार जमा, जाणून घ्या नेमकं कधी येणार पैसे…


Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत.

आतापर्यंत योजनेचे तीन हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्याच दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना एक खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले होते. Ladki Bahin Yojana

भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे १५०० रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील, असे अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण ३००० रुपये मिळणार आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी घोषणा करताना हे ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत येतील, हेही सांगितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार येत्या १० ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे ३००० रुपये मिळणार आहेत. म्हणजेच साधारण सहा ते सात दिवसांत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरूवात होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!