Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून सरकारचीच केली फसवणूक, पत्नीच्या नावे ३० अर्ज भरले, २६ अर्जाचे पैसेही आले, नेमकं काय घडलं?


Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात. महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना ३००० रुपये दिले जात आहेत.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. . या योजनेचा राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे.

काच महिलेच्या नावे ३० वेगवेगळे अर्ज, वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत मिळणारी रक्कम लाटल्याचा प्रकार घडला आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे ३० अर्ज दाखल करुन एकच मोबाईल नंबर नोंदवला केले. Ladki Bahin Yojana

या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत २६ अर्जांची रक्कम जमा झाली आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून २७ महिला असल्याचं दाखवलं असल्याचं देखील उघड झालं आहे, या प्रकरणी पनवेल तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरुन दाखल करुन मजूंर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. महामुनी यांनी पनवेलमधील भाजपचे माजी नगरसवे निलेश बाविस्कर यांना अर्ज दाखल करण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी मदत मागितली.

दरम्यान, 29 ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदवून लॉगीन करण्याचा प्रयत्न केला असता लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली, यामुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!