Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात ३००० मिळण्यास सुरुवात, मग ४५०० रुपये कोणाला भेटणार?, जाणून घ्या..


Ladki Bahin Yojana : महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना ३००० रुपये दिले जात आहेत.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या महिलांना ४५०० रुपये मिळणार? आता काही महिन्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपयांऐवजी ३००० रुपये का आले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार? हे समजून घेऊयात..

लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले. तसेच ३१ ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जाते. Ladki Bahin Yojana

त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधीवाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे.

दरम्यान, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण ३००० रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण ४५०० रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!