Ladki Bahin Yojana 2024 : घोटाळा होताच सरकार सावध, लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आता कसून तपासणी होणार, महत्वाची माहिती आली समोर…


Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे, अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकार होत असल्याचं देखील समोर आलं आहे.

काही पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे २६ अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेत सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. Ladki Bahin Yojana 2024

यासंदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यात अनेक बनावट अर्ज भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचबरोबर अर्जाबाबत होणारे गैरप्रकर आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आलेला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!