Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेसाठी पुणेकरांची गर्दी, हवेली तालुका सर्वात पुढे, आले ‘इतके’ अर्ज…


Ladki Bahin Yojana 2024 : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची सातत्याने चर्चा सुरु आहे. या योजनेद्वारे 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.

गेल्या 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून हे अर्ज दाखल झआले असून पुणे शहरातून 75 हजार 87 अर्ज दाखल झाले आहेत. तर, हवेली तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत.

राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या आकेडवारीनुसार सोमवार 5 जुलै 2024 पर्यंत, हवेली तालुक्यात 3 लाख 54 हजार 97, पुणे शहर 75 हजार 817, बारामती 68 हजार 622, इंदापूर 63 हजार 486, जुन्नर 59 हजार 31, शिरुर 57 हजार 287, खेड 54 हजार 802, दौंड 52 हजार 34, मावळ 46 हजार 13, आंबेगाव 39 हजार 75, पुरंदर 37 हजार 967, भोर 29 हजार 411, मुळशी 27 हजार 434 आणि वेल्हा 7 हजार 746 असे एकूण 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी 85.57 टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला असून 78.78 टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी महिलांना एकाच वेळी दोन हप्ते दिले जाणार आहेत. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. मात्र जोपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत इतर योजनांना ब्रेक लागल्याची माहिती समोर येते. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून पुणे जिल्ह्यात 9 लाख 72 हजार 819 अर्ज आले आहेत. Ladki Bahin Yojana 2024

प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2 लाख 28 हजार 474 अर्ज हे ऑफलाईनरित्या प्राप्त झाले होते. त्यातील 1 लाख 89 हजार 902 अर्ज पोर्टलवर भरण्यात आले असून इतर अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रियेत आतापर्यंत 7 लाख 66 हजार 392 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर 795 अर्ज नाकारण्यात आले आहेत.

दरम्यान, 65 हजार 265 अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येत असून त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे तसेच उर्वरित पात्र महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!