Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण घोषणेची घोषणा झाली, पण हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट दिवसच सांगितला..


Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे..

योजनेची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट असून, जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान याचा हप्ता कधी जमा होणार अशा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. Ladki Bahin Yojana 2024

लाडकी बहीण योजनेचे १,५०० खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न अनेकांना होता आता या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या योजनेचे पैसे थेट ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, १ जुलैपासूनच पहिल्या हप्त्याची तारीख पकडली जाईल. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारने तारीख देखील वाढवून दिली आहे. त्यामुळे महिलांनी जास्त गर्दी करू नये वेळ आल्यास आणखी अर्ज भरण्याची मुदत वाढवून देईल असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!