Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे ३००० रुपये एकत्रित मिळणार, कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार पैसे? वाचा…


Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीच्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेचा खूप फायदा झाला. लाडक्या बहिणींनी या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून मतदान केले. या निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मात्र दरमहा २१०० नंतर द्या मात्र डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? असा सवाल लाडक्या बहिणी विचारू लागल्या आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी महिन्यातील रक्कम दिली जाणार आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून बहिणींच्या खात्यात जमा केले. Ladki Bahin Yojana 2024

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे, असे म्हणत निशाणा साधला होता.

आता निवडणूक संपली तरीदेखील ना १५०० रुपये ना २१०० रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) दोन हप्ते मिळतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!