मजुराच्या खात्यात १७ रुपयांऐवजी आले १०० कोटी! घरी नोटीस येताच बसला धक्का…
पुणे : कधी कोणाचे नशिब बदलेल सांगता येत नाही. आता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेवपूर येथील रहिवासी असणारे मोहम्मद नसिरुल्लाह मंडल म्हणाले की, पोलिसांचा अचानक फोन आला आणि माझी झोपच उडाली.
ते म्हणाले, अचानकच माझ्या खात्यामध्ये १०० कोटी रुपये जमा झाले, आणि खरं सांगायचं तर माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. मी बऱ्याच वेळा माझं खातं चेक केलं.
पण प्रत्येक वेळी त्यामध्ये १०० कोटीचं दिसलं, त्यामुळेच मला आश्चर्याचा धक्काच बसला. मंडल यांच्या खात्यामध्ये फक्त १७ रुपये जमा व्हायचे. पण दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी कधी त्यांचे खातेदेखील तपासले नव्हते.
त्यांच्या घरी सायबर सेलचे काही अधिकारी त्यांच्या घरी नोटीस घेऊन आले. तर त्यांच्या खात्यात तब्बल १०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांनी मंडल यांना दिली. त्याबद्दल त्यांची चौकशी केली जाणार आहे.