अखेर फडणवीसांनी दिले किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे आदेश!! म्हणाले, आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण गंभीर..

मुंबई : राज्यातील भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
यामुळे अनेकांनी यावर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागते.
माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.
दरम्यान, आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत. अनिल परब यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतेही प्रकरण दाबले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.