प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप? नेमके प्रकरण पाहून डॉक्टरही हादरले…!


हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तीच्या विचित्र दाव्यामुळे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना धक्का बसला आहे.

मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सीमध्ये पोहोचलेल्या एका तरुणाने घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांना सांगितले की, त्याला शौच करताना काळ्या रंगाच्या सापाने चावा घेतला आणि त्यानंतर हा विषारी साप प्रायव्हेट पार्टमधून पोटात शिरला.

त्यांनतर या तरुणाचा गोंगाट आणि अवस्था पाहून त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याची तपासणी करण्यात आली, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

याबाबत डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केली असता सर्व गोष्टी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर ते म्हणाले, या तरुणाला ड्राय नशेचे व्यसन लागलेले दिसते आणि याच नशेत कधी कधी त्याच्या पोटात दुखत आहे. दारूच्या नशेत तो असे बोलत होता आणि त्याने हीच गोष्ट घरच्यांना सांगितली. नशेमुळे तो असं बोलत असल्याचं डॉक्टर यावेळी म्हणाले आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!