केडगाव हादरले! बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात दोन डॉक्टरांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल…


दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालय, दौंड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव, ता. दौंड) या स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही तसेच गर्भपात करण्याचा अधिकृत अधिकार नसतानाही गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा करून त्याद्वारे अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच डॉ. तुकाराम यशवंत मोटे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या
नावाने व सहीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्याचेही निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघज करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!