कवडीपाट ते उरुळी कांचन पर्यंत ची वाहतुक कोंडी अन् दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नांची आठवण….!
जयदीप जाधव
उरुळी कांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते उरुळी कांचन दरम्यानचा वाहतुक कोंडीचा प्रश्न जनतेसाठी डोकेदुखी ठरु लागला आहे. सुट्टीच्या दिवशी तर या मार्गावर प्रवास करु का , नको म्हणून अशी दिध्वा मनस्थितीत होऊ, लागली आहे. वाहतुक पोलिसांच्या पर्यायापलिकडे या ठिकाणी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने हा प्रश्न सुटेल का, भरोसा उरला नाही, मात्र या वाहतुक कोंडी निमित्त शिरुर-हवेलीचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी नगर महामार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी केलेल्या तीन महत्त्वाच्या बायपास मार्ग निर्मिती करुन केलेल्या प्रयत्नांची आवर्जून आठवण राजकीय पदाधिकाऱ्यांनी काढण्यास सुरू केली आहे.
माणूस संपतो, त्यांची किर्ती मात्र पाठिमागे राहते, अशीच काही आठवण आता बाबुराव पाचर्णे यांच्या रुपाने पदाधिकारी काढू लागले आहेत. स्व. पाचर्णे यांच्या ठळक कामांची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने त्यांच्या हयात नसण्याची उणीवही नागरीक आता बोलत आहे. वाघोली ते शिरुर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली, सणसवाडी व शिक्रापूर ठिकाणी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न हे आजही नागरीकांच्या स्मरणात आहे. वाघोली- शिरूर ची वाहतुक कोंडी ही उड्डानपूल व रस्तारुंदीकरणा शिवाय फुटू शकत नाही असा अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा अंदाज पाचर्णे यांनी खोटा ठरविला होता. आता हेच प्रयत्न नगर रस्ताप्रमाणे सोलापूर रस्त्यावरती करुन कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागणीने होऊ लागले आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली ते शिरुर दरम्यान वाहतुक कोडी सोडविण्यासाठी वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर या ठिकाणची वाहतुक बायपास मार्गे वळण्याचा प्रयोग यशस्वी करुन त्यांनी नागरीकांची वाहतुक कोंडी मोठी सुटका केली होती. त्यांनी पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य शासनाचा निधी आणित त्यांनी तळेगाव ते कासारी फाटा, जॉन डियर कंपनी ते पिंपळे जगताप (चाकण रोड ) तर वाघोली, वाघेश्वर चौक ते सुरभी हॉटेल लोणीकंद असा बायपास काढून वाघोली, तळेगाव व शिक्रापूर चौकांचा श्वास मोकळा केला होता. तसेच नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्याचा यशस्वी केला आहे.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तळेगाव ते कासारी बायपासने शिरुर -हवेली तालुके हे बाह्यमार्गाने जोडले जाऊन कमी अवधीत सोलापूर व नगर रस्त्यांची वाहतुक एकमेकांना जोडली आहे असा अभिमान पाचर्णे यांचे समर्थक राहुल गवारी यांनी सांगितले.
आता असाच काही प्रयत्न कवडीपाट ते उरुळी कांचन दरम्यान वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मदतगार होऊ शकतो असा विश्वास पदाधिकारी बोलत आहे. त्यासाठी कवडीपाट ते उरुळी कांचन दरम्यान असे काही बायपास पीएमआरडीएने उभे करावेत अशी मुख्य मागणी आहे. उरुळी कांचन, थेऊर फाटा व लोणी स्टेशन भागात जाणारी वाहतुक पूर्वी नकाशात असलेल्या रस्त्यांना
डिपी रस्त्यांचा दर्जा देऊन बायपास तयार करावे अशी गरज निर्माण झाली आहे.
पुणे- सोलापूर महामार्गालगत पीएमआरडीएने विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात काही मार्गांसाठी जागा राखीव केली आहे. या आराखड्यात कवडी पाट ते उरुळी कांचन असा बाह्यवळन मार्ग तयार करुन भविष्यात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी रोड मॅप तयार करावा , अशी गरज आहे. सोलापूर महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी उड्डानपूल, भुयारी मार्ग अशी मान्यता मिळाली आहे, परंतु या प्रस्तावांना प्रत्यक्षात उतरण्यास मोठा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न लक्ष्मणरेषा ओलांडून जाण्यासारखा ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.