चला कर्तव्य पार पाडा! कर्नाटकमध्ये आज मतदान, मतदानाच्या आकड्यांवर निकाल अवलंबून

कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. आता आज याठिकाणी विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक बडे नेते आहेत. यामुळे अनेकांचे वर्चस्व पणाला लागले आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः निवडणूक लढवत आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी असे अनेक दिग्गज रिंगणात आहेत. यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता आज मतदान किती टक्के होणार यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. असे असताना भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस आहे. काँग्रेसचे पारडे जड असल्याचे देखील सांगितले जात आहे.
Views:
[jp_post_view]