कशी होती कराडची तुरुंगातील पहिली रात्र? चहापाणी सोडलं, जेवणही नाकारलं, नेमकं काय घडलं?

बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं.
त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात काल रात्री उशिरा हजर करण्यात आले आहे. त्यानंतर केजमधील कोर्टाने कराडला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. थाटात जगत असलेल्या वाल्मिक कराडची तुरुंगातील पहिली रात्र फारशी चांगली राहिली नसल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वाल्मिक कराड यांनी रात्रीपासून जेवण घेतले नाही. सकाळी नाश्ताही केला नाही. वाल्मिक कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. रात्री कराड हा ऑक्सिजन लावून झोपले होते, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
रात्री उशिरा तुरुंगात गेल्याने वाल्मिक कराड हा सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सउठले. काळी आवरल्यानंतर त्यांनी चहा, नाश्तादेखील घेतला नाही. वाल्मिक कराडला मधुमेहचा त्रास आहे. त्यामुळे कराडला आग्रह केल्यानंतर त्यांनी सकाळी ११.३० वाजता सरकारी जेवण घेतले. त्यावेळी त्याने अर्धी चपाती खाल्ली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भात किंवा खिचडी देण्याची मागणी त्याने केली असल्याचे समजते.