Kanpur : पाणीपुरीवरुन जोरदार राडा! आपसात भिडले दोन गट, लाठ्या, काठ्या अन् गोळीबारही झाला…

Kanpur : सध्या अनेक छोट्या – छोट्या कारणावरून वाद होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाण्यावरून दोन गटात असा वाद झाला की गोळ्या झाडल्या गेल्या आणि यात अनेक लोक जखमी झाले.
या घटनेत बुधवारी सायंकाळी एका चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. तसेच वादानंतर काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानातील लोकांवर हल्ला केला, ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला. Kanpur

दरम्यान, छतावर असलेल्या घरमालकाने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले असून, कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.


दरम्यान, ही घटना कानपूरमधील राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात घडली. या घटनेतील एका पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ लोकांवर नावासह आणि १० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.