पत्रकाराने ट्रम्प यांच्यासमोरच मोदींना विचारला गौतम अदाणींबाबत ‘तो’ प्रश्न, मोदींचे उत्तर ऐकून सगळेच अवाक, म्हणाले, अशा वैयक्तिक…

वॉशिंग्टन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत उद्योजक गौतम अदानी यांच्यावरून टीका केली जाते. आता नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. यावेळी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या मात्र पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पंतप्रधान मोदींना अदाणी लाच प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता मोदींनी यावर बोलणे टाळले. याबाबतचे कारण देखील त्यांनी संबंधित पत्रकाराला सांगितले. यामुळे याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत उद्योगपती गौतम अदानी यांच्या लाच प्रकरणावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते.
तसेच दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदाणी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. यामुळे विरोधत मोदींना सतत टार्गेट करतात.
या आरोपांनुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकार्यांना सुमारे 2,100 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामुळे राहुल गांधी यांनी देखील सतत आरोप केला आहे. यामुळे केंद्र सरकारला अनेकदा त्यांनी अडचणीत आनले आहे.