तरुणांसाठी कामाची बातमी! एसटीमध्ये मेगाभरती 17450 चालक सहाय्यक भरणार, जाणून घ्या…


मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. एसटीमध्ये मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. यासाठी येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना  रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा, असे आवाहन देखील केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता.

नंतर पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला गती येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३० हजार वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष  कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया  अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!