गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जिओचा शेअर करणार बाजारात धमाका, जाणून घ्या…

मुंबई : शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओचा शेअर आपल्याला बाजारात धुमाकूळ घालताना दिसणार आहे. जिओ फायनेन्शिअलचा शेअर लवकरच बाजारामध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, याबाबत नुकतीच बीएसईकडून एक नोटीस काढण्यात आली आहे. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झाली आहे. या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिलायन्सचे 1000 शेअर असतील तर या गुंतवणूकदारांना JFSLचे 1000 शेअर मिळतील. यामुळे त्यांचा फायदा होणार आहे.
हे शेअर्स बाजारात लवकरच सूचीबद्ध होतील. त्यानंतर ट्रेडिंग सेक्शन सुरु होणार आहे. जिओचे स्मार्टफोन, लॅपटॉप नंतर आता जिओचे शेअर्स बाजारात धुमाकूळ घालतील. यामधून अनेकजण आपली गुंतवणूक करणार आहेत.
अनेक गुंतवणूकदार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे ही एक मोठी संधी अनेकांना मिळाली आहे. अनेकजन आता यासाठी तयार आहेत.