धक्कादायक ट्रेंड! ‘या’ देशात खरंच भाड्याने पत्नी मिळते का? सत्य काय आहे जाणून घ्या…


नवी दिल्ली : जगातील विविध देश त्यांच्या संस्कृती आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखले जातात, परंतु थायलंडमधील एक प्रथा सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. पट्टाया सारख्या शहरांमध्ये पर्यटकांना ठराविक कालावधीसाठी ‘भाड्याने पत्नी’ देण्याची एक अनोखी संकल्पना विकसित झाल्याचे बोलले जात आहे.

ही पद्धत आता केवळ एक प्रथा न राहता एका प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप घेत असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पातळीवर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

थायलंडमध्ये पर्यटकांना सोबती मिळावा या उद्देशाने ही वैयक्तिक करारावर आधारित व्यवस्था सुरू झाल्याचे मानले जाते. यामध्ये महिला ठराविक कालावधीसाठी पर्यटकांसोबत पत्नीप्रमाणे राहतात. हा कोणताही कायदेशीर किंवा धार्मिक विवाह नसून, पूर्णपणे करारावर आधारित नाते असते.

या काळात संबंधित महिला पर्यटकांसोबत प्रवास करणे, त्यांची काळजी घेणे आणि वेळ देणे अशा जबाबदाऱ्या पार पाडते. हा करार काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असू शकतो, जो दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीवर अवलंबून असतो.

मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक थायलंडला भेट देतात, ज्यामध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. अशा पर्यटकांना स्थानिक सोबतीची गरज भासते आणि त्यातूनच या प्रकाराला चालना मिळाल्याचे सांगितले जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनल्याचे चित्र काही ठिकाणी दिसते.

या व्यवस्थेसाठी आकारली जाणारी रक्कम कोणत्याही अधिकृत कायद्याने निश्चित केलेली नसते. ही किंमत प्रामुख्याने संबंधित महिलेचे शिक्षण, वय आणि व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून ठरते. विविध अहवालांनुसार, या सेवेसाठी साधारणपणे १,६०० डॉलर्सपासून ते १,१६,००० डॉलर्सपर्यंत खर्च येऊ शकतो. ही संपूर्ण व्यवस्था खाजगी करारावर आधारित असल्याने त्यामध्ये कायदेशीर गुंतागुंत आणि सामाजिक वादही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!