योजनेच नेमकं चाललंय काय? १५ तारीख आली तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही, पैसे कधी मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले . मात्र आता नववर्ष आलं, जानेवारी महीना सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले, तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे १५०० मिळून एकूण ९ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे.
मात्र आता जानेवारी महिन्याचे १५ दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच , ते पैसे कधी मिळणार याब्दल काहीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार ? असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरूवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते, त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिलांच्या ओठी होता.
काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे.